तलवारीचा धाक दाखवुन वाटमारी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद.
हिंगोली नांदेड जिल्हयात 6 ठिकाणी जबरी चोरी केल्याचे उघड
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
3 ऑक्टोबर 2024
स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीची कार्यवाही
हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली जिल्हयात होणा-या मालाविरुध्दच्या गुन्हयांस प्रतिबंध करून, गुन्हे उघड करण्याबाबत नेहमी सुचना देत असतात तसेच गुन्हयास प्रतिबंध करण्यासाठी वेळोवेळी कॉबींग ऑपरेशन, नाकाबंदी, ऑल आऊट ऑपरेशन राबवीत असतात. पो.नि.श्री विकास पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली यांना हिंगोली जिल्हयातील मालाविरुध्दच्या गुन्हयांना आळा घालुन गुन्हे उघड करण्याबाबत सुचना संदर्भाने स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक जिल्हयातील मालाविरुध्दच्या गुन्हयांचा समांतर तपास करीत होते.
दिनांक १९/०९/२०२४ रोजी रात्री ११.०० वा.चे सुमारास आसेगाव वसमत रोडवर फिर्यादी नामे कैलास प्रल्हादराव कदम, वय २९ वर्ष, धंदा व्यापार, रा. पाटीलनगर, वसमत यास अज्ञात तिन चोरटयांनी रस्ता अडवुन तलवारीने गंभीर जखमी करून जबरीने मोबाईल, रोख रक्कम व मोबाईल हॅडसेट असा ९६,०००/- रू चा मुद्देमाल जबरीने चोरून नेल्यासंदर्भाने पो.स्टे. वसमत ग्रामीण गुरनं. २३६/२०२४ कलम ३०९ (६) भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन गुन्हेगारास तात्काळ जेरबंद करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्था.गु.शा. पो.नि.श्री विकास पाटील यांना सदर गुन्हा उघड करण्याच्या सुचना देवुन सपोनि. श्री शिवसांब घेवारे यांचे एक विशेष पथक निर्माण करण्यात आले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्हा घडल्यापासुन बारकाईने गुन्हयाचे विश्लेषण करून तांत्रिक अभ्यास करून गोपनिय माहिती काढली असता सदरचा गुन्हा हा १) हरज्योतसिंघ चरनजितसिंग बिंद्रा, वय २२ वर्ष, रा.पंचवटीनगर, वसरनी, नांदेड, २) बलप्रितसिंग भुपेंद्रसिंग कदंब, वय २६ वर्ष, रा. पंचवटीनगर, वसरनी, नांदेड, ३) रोहित मारोती जाधव, वय २१ वर्ष, रा.शंकरनगर, वसरणी, नांदेड यांनी केल्याची माहिती मिळाली असता स्था.गु.शा. पथकाने आरोपीस नांदेड शहरातुन अतिशय शिताफीने ताब्यात घेवुन कौशल्यपुर्वक विचारपुस केली असता सदर आरोपीतांनी उपरोक्त प्रमाणे गुन्हा केल्याचे कबुलकरून गुन्हयातील चोरलेले मोबाईल, चोरलेले मोबाईल डिस्प्ले, गुन्हयात वापरलेले मोबाईल, गुन्हयत वापरलेली मोटार सायकल, गुन्हयात वापरलेला खंजर, रोख रक्कम असा १,५०,०००/- चा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपीस अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केली असता आरोपींनी नांदेड शहरात उस्मान नगर रोड, मालेगाव रोड, पुर्णा रोड, मालेगाव रोड पेट्रोल पंपाजवळ व आसेगाव वसमत रोड अशा एकुण ०६ ठिकाणी सुध्दा जबरी चोरी केल्याचे सांगीतले.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.श्री विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.श्री. शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार नितिन गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, साईनाथ कंठे, दत्ता नागरे, इरफान पठाण, स्था.गु.शा. हिंगोली यांनी केली आहे.
إرسال تعليق