हिंगोलीत सहाय्यक अभियंत्याचा व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
01 आफ्टंबर 2024
नांदेड विभागाच्या विज कंपनीच्या थकीत देयकाच्या वसुलीसह इतर
थकीत देयकाच्या वसुलीसह इतर सुचनांसाठी आज मंगळवारी दुपारी व्हिडीओ कॉन्फरंन्सींगद्वारे आयोजित बैठकीत हिंगोलीत सहाय्यक अभियंत्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी मंगळवारी घडली आहे. सचिनचा
मृतदेह हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात हलविण्यात आला आहे.
विज कंपनीच्या नांदेड विभागांतर्गथ नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्याचा समावेश आहे. नांदेड येथील मुख्य अभियंता कार्यालयाकडून व्हिडीओ कॉन्फरंन्सींगद्वारे बैठका घेऊन आवश्यक त्या सुचना तीनही
जिल्ह्यातील विज कंपनीच्या अभियंत्यांना दिल्या जातात.
दरम्यान, आज दुपारी साडेबारा वाजता मुख्य अभियंता कार्यालय नांदेड यांच्याकडून व्हिडीओ कॉन्फरंन्सींगद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याबैठकीस तीनही जिल्ह्यातील अभियंत्यांना उपस्थित राहण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार आज दुपारी साडेबारा वाजता बैठक सुरु झाली. या बैठकीत हिंगोलीच्या विज कंपनीच्या कार्यालयातील सर्व अभियंता सहभागी झाले होते. बैठकीमध्ये थकीत विज देयक वसुली सोबतच
इतर सुचना दिल्या जात असतानाच हिंगोली कार्यालयातील सहाय्यक अभियंता सचिन दत्तात्रय कोळपे वय ३५ वर्ष हे खुर्चीवरून खाली कोसळल्याने
या बैठकीत उपस्थित इतर अधिकाऱ्यांनी तातडीने त्यांच्याकडे धाव घेतली. त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याने त्यांना तातडीने हिंगोली येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते
मात्र उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले त्यानंतर मयत अभियंता सचिन कोळपे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकिय
रुग्णालयात दाखल केला आहे. या घटनेमुळे हिंगोली विज कंपनीच्या कार्यालयावर शोककळा पसरली असून संपूर्ण कामकाज बंद करून
सामान्य रुग्णालय येथे वीज वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती
पोलीस उप विभागीय अधिकारी सुरेश दळवे व
हिंगोली शहरचे पोलीस निरीक्षक
नरेंद्र पडळकर यांनी मयत सचिनच्या नातेवाकांना भेट देऊन विचारपूस केली
मयत सचिन यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी असा परिवार असून ते मुळचे नांदेड येथील रहिवासी असल्याचे विज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
إرسال تعليق