हिंगोलीत शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिकास दहा हजार रुपयाची लाच घेताना रंगे हाथ पकडले


  शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिकास   दहा हजार रुपयाची लाच घेताना रंगे हाथ पकडले 


महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
21 सप्टेंबर 2024 
 सविस्तर माहिती अशी की लोकसेवक गजानन पुंजाजी पळसकर, शिक्षक वर्ग-३, सर्वोदय विदयालय, खुडज ता. सेनगाव जि. हिंगोली प्रतिनियुक्ती वरीष्ठ लिपीक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, कार्यालय, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद हिंगोली यांनी यांनी १०,०००/- रू. लाचेची मागणी करून दि.२१.१०.२०२४ रोजी सापळा कार्यवाही दरम्यान १०,०००/- रू. लाचेची रक्कम स्विकारल्याने त्याचे विरूध्द पोलीस स्टेशन हिंगोली शहर जि. हिंगोली येथे गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.
पिडीत तकारदार यांनी दि.१४.१०.२०२४ रोजी तकार दिली की, आरोपी लोकसेवक गजानन पुंजाजी पळसकर, सहशिक्षक वर्ग ३, सर्वोदय विदयालय, खुडज ता. सेनगाव जि.हिंगोली प्रतिनियुक्ती वरीष्ठ लिपीक, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद हिंगोली हे तकारदार यांचे नावे असलेल्या अंनत टाईप रायटींग अॅन्ड शॉर्टहँड इन्स्टिट्युट मध्ये संगणकाचे प्रशिक्षण देण्यासाठी नविन संगणक मान्यताचा प्रस्तावाची तपासणी करणे करीता शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे पत्र तयार करून फाईल सादर करण्यासाठी १०,०००/- रू. च्या लाचेची मागणी करत असल्याबाबत अॅ. क. ब्युरो हिंगोली कार्यालयात तकार दिली. त्यावरून दि.१४.१०.२०२४ रोजी लाच मागणी पडताळणी केली असता लोकसेवक पळसकर यांनी तकार यांचेकडे कामासाठी १०,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले, त्यावरून दि.२१.१०.२०२४ रोजी तकारदार यांचे तकारीची पडताळणी करून सापळा कार्यवाही दरम्यान पंचासमक्ष लोकसेवक पळसकर यांनी १०,०००/- रू. लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

आरोपी लोकसेवक गजानन पुंजाजी पळसकर, शिक्षक वर्ग-३, सर्वोदय विदयालय, खुडज ता. सेनगाव जि. हिंगोली प्रतिनियुक्ती वरीष्ठ लिपीक, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद हिंगोली यांचे विरूध्द पोलीस स्टेशन हिंगोली शहर जि. हिंगोली येथे गुन्हा दाखल करण्याची पुढील कारवाई सुरू आहे.

ही कामगिरी श्री संदीप पालवे पोलीस अधीक्षक, मा. डॉ. संजय तुंगार अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, नांदेड यांचे मार्गदर्शना खाली, श्री विकास घनवट, पोलीस उप अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, हिंगोली यांनी श्री प्रफुल्ल अंकुशकर, पोलीस निरीक्षक, श्री. विनायक जाधव, पोलीस निरीक्षक, सपोउपनि विजय शुक्ला, पोहेकॉ तान्हाजी मुंढे, ज्ञानेश्वर पंचलींग, रविंद्र वरणे, गजानन पवार, भगवान मंडलीक, पोह गोविंद शिंदे, पोह राजाराम फुपाटे, शिवाजी वाघ, मपोह योगीता अवचार, चापोह श्री शेख मन्नान अॅन्टी करप्शन ब्युरो, हिंगोली यांचे मदतीने यशस्वीपणे केलेली आहे.

Post a Comment

أحدث أقدم