डॉ. रमेश शिंदे यांची तब्येत
खालावली लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू
17 ऑक्टोबर 2024
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
शेतकरी नेते डॉक्टर रमेश शिंदे यांनी मागील पाच दिवसापासून हिंगोली शहरातील एमएससीबी कार्यालय समोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी उपोषण सुरू केले होते
मात्र काही एम एस ई बी चे अधिकारी यांनी थातूरमातूर उत्तर देऊन कोणतेही अद्याप मागणी पूर्ण केली नसल्याने डॉक्टर शिंदे यांनी पाच दिवस अन्नत्याग उपोषण सुरू केले होते
दरम्यान आज त्यांना अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने
शहरातील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये त्यांना पुढील उपचारासाठी भरती केले
असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्टर अखिल अग्रवाल यांनी सांगितले
إرسال تعليق