अपहरण मुलीची सहा तासांत केली सुटका पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडाळकर


अपहरण  मुलीची सहा तासांत केली सुटका पोलीस निरीक्षक नरेंद्र 
पाडाळकर 

महाराष्ट्र 24 न्यूज  नेटवर्क
05 ऑक्टोंबर 2024
हिंगोली : शहरातील एका बिहारी
   व्यक्तीने अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीची पोलिसांनी सहा तासांमध्ये सुटका केली असून, या मुलीस तिच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत केले आहे.

हि बिहारी व्यक्ती मागील सहा ते सात महिन्यांपासून हिंगोली येथे वास्तव्याला होती. ४ ऑक्टोबर रोजी एक अल्पवयीन मुलगी सायंकाळी उशिरापर्यंत घरी परतली नाही. रात्रीपर्यंत तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास थेट हिंगोली शहर पोलिस ठाणे गाठून अपहरणाचा गुन्हा नोंद केला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले होते. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्यासह पोलिस पथकाने शोध मोहीम सुरू केली. पहाटे आरोपीचा शोध लागला. पोलिसांनी अल्पवयीन मुलीसह आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर या मुलीस सुखरूप कुटुंबीयांकडे स्वाधीन केले. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, सपोनि गणपत जाधव, अशोक धामणे, संजय मार्के, राहुल जोगे, अमजद शेख,
संतोष खिल्लारे यांच्यासह महिला
कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता

Post a Comment

أحدث أقدم