52 लाखांचा मुद्देमाल फिर्यादीस केला परत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
01 डिसेंबर 2024
हिंगोली : जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपींकडून हस्तगत केलेला २० लाख ६८ हजारांचा मुद्देमाल ३० नोव्हेंबर रोजी फिर्यादींना परत करण्यात आला.
जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून तपास करण्यात येतो. यात तपास पूर्ण झाल्यानंतर जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आरोपींकडून जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ३० नोव्हेंबर रोजी ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील एकूण चार
आतापर्यंत ५२ लाखांचा मुद्देमाल परत पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे
यांनी पदभार स्वीकारल्यापासून आतापर्यंत ५२ लाख ५४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात आला. यापुढेही ही मोहीम सुरूच राहणार आहे. गुन्ह्यांतील २ लाख ६८ हजार रूपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, १८ लाखांची १४ वाहने असा एकूण २० लाख ६८ हजारांचा मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात आला. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील पोलीस निरीक्षक नरेंद्र
पाडाळकर पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.
إرسال تعليق