सरकारी कामात अडथळा मालमत्ता नुकसान प्रकरनी आरोपीची निर्दोष मुक्तता
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
29 नोव्हेंबर 2024
घटनेची सविस्तर माहिती अशी की
फिर्यादी नारायण शामराव वडे यांच्या फिर्यादी वरून शासकीय कामात अडथळा व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आरोपी सचिन जाधव संतोष खंदारे गजानन बांगर पांडुरंग झाडे यांच्यावर कलम 336 353 427 34 भांदवीप्रमाणे व सहकलम 3 सार्वजनिक मालमत्ता प्रतिबंध कायदा गुर न 14/2014 दाखल झाला होता .
त्यानंतर विद्यमान न्यायालयात दोषारोप दाखल झाला व दोषारोप दाखल झाल्यानंतर सरकारी पक्षाने एकूण प्रस्तुत प्रकरणात सहा साक्षीदार तपासले परंतु विद्यमान अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश देशमुख साहेब यांनी पुराव्या अभावी दिनांक 27/11/2024 रोजी प्रस्तुत प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
आरोपीच्या वतीने अँड जी के गायकवाड पाटील यांनी काम पाहिले व अँड योगेश खिलारी , अँड रिठे , अँड प्रफुल ठोके यांनी सहकार्य केले
إرسال تعليق