शरीर सुखासाठी 21 वर्षीय महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न पोलिसात गुन्हा दाखल

शरीर सुखासाठी  21 वर्षीय महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न पोलीसात गुन्हा दाखल

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
07 डिसेंबर 2024 
हिंगोलीः ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमधील एका गावातील २१ वर्षीय महिलेस शरीर सुखाची मागणी करून. तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याने हिंगोली ग्रामीण पोलिसात दोन आरोपींवर विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमधील एका गावामध्ये ५ डिसेंबर गुरूवार रोजी सायंकाळच्या सुमारास २१ वर्षीय महिला घरामध्ये

हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील घटना

• संतुक पिंपरी येथील दोन आरोपींवर गुन्हा दाखल

एकटी असल्याचे पाहून घरात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेऊन विकास कैलास गिरी, रत्नराज भिमराव काशिदे रा. संतुक पिंपरी या दोघांनी महिलेच्या घरात अनाधिकृतरित्या प्रवेश करून महिलेचा विनयभंग विकास गिरी याने केला. त्यानंतर रत्नराज काशिदे या आरोपीने महिलेस शरीर

सुखाची मागणी करून तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. विनयभंग व घडलेला प्रकार तू जर तुझ्या पतीला सांगितलास तुझ्यासह पतीला खत्म करून टाकतो, अशी जिवे मारण्याची धमकी दिल्याने हिंगोली ग्रामीण पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून विकास कैलास गिरी, रत्नराज भिमराव काशिदे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास असलम गारवे हे करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم