ॲट्रोसिटी, खुनाचा प्रयत्न केल्याच्या गंभीर प्रकरणातील आरोपीची जामीन मंजूर



 ॲट्रोसिटी, खुनाचा प्रयत्न केल्याच्या गंभीर प्रकरणातील  आरोपीची  जामीन मंजूर

 महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क 
24 डिसेंबर 2024

प्रकरणातील
सविस्तर माहिती अशी की
     दि. 15/10/2024 रोजी पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे फिर्यादीने फिर्याद दिली की, आरोपींनी फीर्यादीला व फीर्यादीच्या मित्राला धारदार खंजीर व लोखंडी रॉडने जिवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जख्मी केले .
  तरी फीर्यादीच्या फिर्याद वरून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गु. र. नं. 694/2024 कलम 352, 351(3), 3(5), 109 भारतीय न्याय संहीता 2023 व 3(1)(s), 3(1)(r), 3(2)(5) अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायादा व 4, 25 भारतीय हत्यार कायद्यान्वये  गुन्हा नोंदविण्यात आला होता.
 सदरील गुन्ह्यामधील अटक आरोपी नामे शेख तौफिक शेख मुसा याने ॲड अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत  वि. जिल्हा व सत्र न्यायालय  हिंगोली येथे अटकपूर्व  जामिन साठी अर्ज दाखल केला होता.
सदर प्रकरणामध्ये वि. मा. जील्हा व सत्र न्यायाधीश, श्री आर व्ही लोखंडे साहेब  यांनी दोन्ही पक्षाचा  युक्तीवाद ऐकून दि. 12/12/2024  रोजी  आरोपीची  जामिन मंजूर केली आहे.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख , ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी  युक्तीवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख ,  ॲड.राहूल देशमुख,  ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.मुदस्सीर अ.रहिम, ॲड.लखन पठाडे,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,अँड रुपाली खिल्लारे मॅडम शेख आदील शेख अजीस यांनी सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم