अनोळखी मृत तरुणीची ओळख पटविणे बाबत
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
25 डिसेंबर 2024
घटनेची सविस्तर माहिती असे की
पोलीस स्टेशन औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली हद्दीत दि. २४ डिसेंबर रोजी मौजे वगरवाडी गावाजवळ रोडलगत झाडी मध्ये एक अनोळखी तरुणीचे प्रेत आढळले असुन सदर मृत तरुणीचे अदांजे वय २० वर्षे रंग सावळा, बांधा सडपातळ, उंची ०५ फुट आहे. तसेच गळयात केसरी रंगाच्या धाग्यामध्ये रुद्राक्ष व त्या लगत काचेचा हिऱ्यासारखा मनी आहे. त्यासोबत गळयात दुसरी एक पिवळसर लाल मिश्र धाग्याची दोरी असुन डाव्या हातात मनगटाला केसरी रंगाचा धागा बांधला आहे. तसेच दोन्ही हातात हिरव्या रंगाच्या दोन प्लास्टीक बांगडया आहेत.
मयताच्या अगांवर तपकिरी (ब्राउन) रंगाचा तिन बटनाचा स्वेटर व आत मध्ये निळसर रंगाचा टॉप व राखाडी रंगाचा जिन्स पँन्ट आहे. तसेच सोबत एक व्हाइट रंगाचा शॉर्ट टॉप फिक्कट काळसर रंगाचा शॉर्ट टॉप व गुलाबी रंगाचा टॉवेल आहे. मयताच्या कानात लाल मण्याच्या दोन काड्या आहेत.
तरी वरील वर्णनाची तरुणी आपल्या हद्दीत मिसींग हरविलेली मिळुन आल्यास अपहरण झालेली असल्यास पोलीस स्टेशन औंढा नागनाथ किंवा स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली येथे खालील क्रमांकावर संपर्क करावा.
असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नागरिकांना केले आहे
पोनि विकास पाटील स्थागुशा, हिंगोली मो.क्र. ९२२६६११०११
पोनि गणेश राहिरे, पोस्टे औंढा नागनाथ मो.क्र. ९८२३४४५४९२
إرسال تعليق