उबाठा शिवसेनेला राम राम ठोकत कांतराव पाटील वरुडकर यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश..
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
26 डिसेंबर 2024
पुसेगाव सर्कलमधील कांतराव पाटील वरुडकर यांनी अखेर भारतीय जनता पार्टीचे हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये पक्षप्रवेश केला आहे.
त्यांच्यासोबत वरुड काजी, वरुड समंद ,पुसेगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये पक्ष प्रवेश केला आहे .
कांतराव पाटील वरुडकर हे मागील पंचवीस वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांनी अनेक वेळा ग्रामपंचायतचे सदस्यत्व व उपसरपंच पद भूषवले आहे त्यांच्या पक्षप्रवेशाने भाजपाला पुसेगाव सर्कलमध्ये अनुकूल वातावरण निर्माण झालं असल्याचं बोललं जात आहे
यावेळी सरपंच ज्ञानेश्वर भंडारे, ग्रामपंचायत सदस्य शंकर पवार, उपसरपंच सुभाष शिंदे, ग्रा.सदष्य विलास आहेर, आदिंसह ग्रामस्थांचा पक्षप्रवेश झाला आहे
إرسال تعليق