चोरी गेलेला मुद्देमाल फिर्यादीस सन्मानपूर्वक परत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
31 डिसेंबर 2024
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या संकल्पनेतुन हिंगोली जिल्हा घटकातील पो.स्टे.चे गुन्हयातील आरोपीकडुन हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत मोहीम राबवुन एकुण २५,२२,५०० /- रुपयाचा मुद्देमाल फिर्यादीस सन्मानपुर्वक परत
मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, हिंगोली यांचे संकल्पनेतुन हिंगोली जिल्हा घटकातील बाकरुन जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पो.स्टे. स्तरावर मोहीम राबविण्याबाबत सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना सुचना देण्यात आल्या होत्या.
त्याअनुषंगाने दिनांक ३१/१२/२०२४ रोजी हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पो.स्टे. स्तरावर गुन्हयात आरोपीकडुन हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल, फिर्यादीस परत करण्याबाबत मोहीम राबविण्यात आली असुन सदर मोहीमे दरम्यान जिल्हयातील एकुण ०२ गुन्हयातील सोन्या चांदीचे दागीने व नगदी असे किमती १,३३०००/- रु, १६ वाहने किंमत १६,२८,०००/- रु ५३ मोबाईल ७,६१,५०० असा एकुण २५,२२,५००/- रु मुद्देमाल आज रोजी फिर्यादीस परत करण्यात आला आहे. मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब यांनी हिंगोली जिल्हयाचा चार्ज घेतल्यापासून आता पावेतो अशाच प्रकारची मोहीम राबवुन एकुण जप्त करण्यात आलेला मुद्देमाल विशेष कार्यक्रमाचे आयोजन करुन एकुण ७७,७७,०००/- ( सत्यातर लाख सत्यातर हजार रूपये) चा मुद्देमाल फिर्यादीस फिर्यादीस सन्मानपुर्वक परत करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक हिंगोली, श्रीमती. अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. विकास एस. पाटील, स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली, पोह/६० प्रेमदास पी. चव्हाण व सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी व पो.स्टे. चे मुद्देमाल मोहरील यांनी अथक परिश्रम घेवुन पार पाडली आहे. भविष्यात अशाच प्रकारे मोहीम राबवुन जास्तीत जास्त जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात येत आहे.
إرسال تعليق