30 लाखांची जादा देयके अनिल गव्हाणकर नितीन बंडाळे निलंबित

30 लाखांची जादा देयके अनिल गव्हाणकर नितीन बंडाळे निलंबित 
 

 जि.प. सीईओंच्या आदेशानंतर सेनगाव पं.स. लेखा विभागातील दोघांवर निलंबनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
08 जानेवारी 2024
 सेनगाव तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा केल्याची ३० लाख रुपयांची जादा देयके दिल्याच्या आरोपावरून पंचायत न समितीच्या लेखा विभागातील दोन • कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी आदेश  काढले
हिंगोली जिल्ह्यात २०१९ ते २०२३ या कालावधीत टंचाई कालावधीतील उपाययोजना म्हणून ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. त्यानुसार टैंकर पुरवठ्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली होती. या
कंत्राटदारास सेनगाव पंचायत समितीच्या वतीने टँकरची देयके अदा करण्यात आली आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सूचनेनुसार सेनगाव तालुक्यात टँकरच्या देयकांची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीमध्ये ३० लाख रुपयांची जादा देयके अदा झाल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले. या संदर्भातील अहवाल आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. यामध्ये पंचायत समितीच्या लेखा विभागातील कर्मचारी नितीन बंडाळे , अनिल गवाणकर यांच्यावर जादा देयक अदा केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यावरून सीईओंनी दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

इतर तालुक्यातही चौकशी
याप्रकरणानंतर आता जिल्ह्यातील इतर चार तालुक्यातही २०१९ ते २०२३ या कालावधीतील टँकर देयकांची चौकशी केली जाणार आहे. या शिवाय कपातीच्या रकमांबाबत सेनगाव तालुक्यात चौकशी सुरु आहे. यातून आणखी काही अनियमितता बाहेर येण्याची शक्यता आहे.

जळीतकांडाची चौकशी थंडावली
औंढा नागनाथ येथील कपातीच्या रकमांची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पथकाने काही दस्तऐवज काढले होते. मात्र दोनच दिवसांत कॅशबुक व इतर साहित्य जळून खाक झाले. या प्रकरणाची चौकशी अद्यापही गुलदस्त्यात आहे. चौकशीपुर्वीच दस्तऐवज जळाल्याने याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

أحدث أقدم