बलात्कार आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
4 जानेवारी 2024
प्रकरणातील
सविस्तर माहिती अशी की
दि. 13/02/2020 रोजी पोलीस स्टेशन सेनगाव येथे फिर्यादीने फिर्याद दिली की, आरोपीनी अनाधिकृतपणे घरामध्ये प्रवेश करून फिर्यादीच्या पत्नीवर बलात्कार करून बलात्काराचा व्हीडीओ काढुन गावामध्ये लोकांना दाखवून बदनामी केली सदर बलात्कारामुळे आरोपींनी दिलेल्या त्रासाला कंटाळुन तिने आत्महत्या केली या आरोपावरून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन सेनगाव येथे गु. र. नं 46/2020 कलम 376(2)(h), 376(d), 306, 452, 506, 34 भा. द. वि. सह कलम 67, 67(अ), 66( ई) माहिती व तंत्रज्ञान अधिनीयम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर प्रकरणामध्ये वि जिल्हा व सत्र न्यायलय हिंगोली येथे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.
तरी सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे एकुण 15 साक्षीदार तपासण्यात आले आणि या प्रकाणतील आरोपी चंद्रभान गणपत कायंदे, याच्या वतीने ॲड पी. के. पुरी, यांनी काम पाहिले तसेच आरोपी परमेश्वर नारायण वावरे व सुरेश नामदेव कायंदे यांच्या वतीने ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी काम पाहिले. व दि 02/01/2025 रोजी विद्यमान न्यायधिश मा. आर. व्ही. लोखंडे साहेब यांनी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद एकून आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
आरोपी परमेश्वर नारायण वावरे व सुरेश नामदेव कायंदे यांच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख , ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख , ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.मुदस्सीर अ.रहिम, ॲड.लखन पठाडे,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,अँड रुपाली खिल्लारे मॅडम शेख आदील शेख अजीस यांनी सहकार्य केले.
إرسال تعليق