किरण लोंढे आत्महत्या प्रकरणी आरोपींना जामीन मंजूर ॲड अजय उर्फ बंटी देशमुख
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
01 फेब्रुवारी 2025
कोचिंग क्लासेस मधील विद्यार्थी किरण लोंढे आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गंभीर प्रकरणातील आरोपींची जामीन न्यायालयाच्या आदेशाने मंजूर करण्यात आला
घटनेची
सविस्तर माहिती अशी की
दि. 13/नोव्हेंबर /2024 रोजी हिंगोली येथे रेल्वे पटरीवर एका तरुणाचा मृतदेह सापडला होता तरी सदर मयताच्या वडिलांनी दि 15/11/2024 रोजी पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे फिर्याद दिली की, फिर्यादीचा मुलगा हा करिअर कोचिंग क्लासेस मध्ये टिवशन घेत होता व मयतच्या जवळ सापडलेल्या चिट्ठी च्या आधारे फिर्यादीच्या लक्षात आले कि त्याच्या मुलाने आरोपींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली
तरी फीर्यादीच्या फिर्याद वरून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गु. र. नं. 774/2024 कलम 108, 3(5), भारतीय न्याय संहीता 2023 कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदरील गुन्ह्यामधील अटक आरोपी नामे अनिल गंगाधर वानखेडे व सतीष कैलास थोरात यांनी ॲड अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत वि. जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली येथे जामिन साठी अर्ज दाखल केला होता.
सदर प्रकरणामध्ये वि. मा. जील्हा व सत्र न्यायाधीश, श्री आर व्ही लोखंडे साहेब यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून दि. 30/01/2025 रोजी दोन्ही आरोपीची जामिन मंजूर केली आहे.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख , ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख, ॲड बाळा साहेब कुटे,ॲड प्रदिप लोंढे, यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख , ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.मुदस्सीर अ.रहिम, ॲड.लखन पठाडे,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,अँड रुपाली खिल्लारे मॅडम शेख आदील शेख अजीस यांनी सहकार्य केले.
إرسال تعليق