मा.आ. रोहीत दादा पवार अध्यक्ष महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या निर्णयामुळे हिंगोलीकरांना लवकरच मिळणार आंतरराष्ट्रीय सुविधा असणारे क्रिकेटचे मैदान.

मा.आ. रोहीत दादा पवार अध्यक्ष महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन   यांच्या निर्णयामुळे हिंगोलीकरांना लवकरच  मिळणार आंतरराष्ट्रीय सुविधा असणारे क्रिकेटचे मैदान.
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
17 फेब्रुवारी 2025
 महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष मा. आमदार श्री रोहित दादा पवार यांच्या प्रगल्भ नेतृत्वाखाली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने महाराष्ट्रामधील खेळाडूंसाठी जिल्हा पातळीवर  क्रिकेटसाठी अंतरराष्ट्रीय सुविधायुक्त  मैदान तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे.

         तरी, हिंगोली जिल्हातील क्रिकेट पटुंना सुद्धा जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व अंतरराष्ट्रीय सुविधायुक्त सुसज्ज असे क्रिकेट मैदान उपलब्ध व्हावे यासाठी हिंगोली जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे पदाधिकारी व सदस्य तसेच जिल्ह्यातील नागरीकांनी  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अपेक्स काँसील सदस्य ॲड अजय उर्फ  बंटी  पंडीतराव देशमुख  यांच्या मार्फत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडे हिंगोली जिल्ह्यासाठी क्रिकेट मैदानाची मागणी केली होती.
       त्यामुळे असोसिएशन चे अध्यक्ष मा.आ. रोहीत दादा पवार व सर्व अपेक्स काउँसील मेंबर यांनी   मंजुरी दिल्यामुळे  या महत्त्वाकांक्षी प्रकल्पा अंतर्गत हिंगोली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने जी  जागा निश्चीत  करण्यात आली, होती   त्या जागेचे  सर्वेक्षण करण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अपेक्स बॉडी मेंबर तसेच  इन्फ्रास्ट्रक्चर प्रमुख श्री सुनीलजी मुथा यांनी रविवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी भेट दिली. 
            श्री सुनीलजी मुथा यांनी हिंगोली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडूंना भेटून  मोलाचे मार्गदर्शन देखील केले.           

      याप्रसंगी हिगोली जिल्हा क्रिकेट असो. चे अध्यक्ष  श्री देवदत्त उर्फ महेश पेंडके व महाराष्ट्रातील उत्कृष्ट व अफलातून फलंदाज तथा बाबासाहेब आबेंडकर विद्यापीठचे डेब्युटन्ट कर्णधार तसेच हिंगोली जिल्हा क्रिकेट असो. चे सचिव  ॲड शामकांत पंडीतराव देशमुख आणि  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी अपेक्स बॉडी मेंबर ॲड अजय देशमुख,  आर्किटेक्ट संतोष मारू, पत्रकार श्याम सोळंके,अरूण दिपके यांच्या उपस्थितीमध्ये सुनील मुथा यांचा विठ्ठल रुक्माई ची प्रतिमा देऊन आदर सत्कार करण्यात आला. 
       
        या क्रिकेट मैदानाच्या माध्यमातून हिंगोली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हिंगोलीतील सर्व नवोन्मेषी उमलत्या क्रिकेटपटूंना क्रिकेटचा सराव करण्यासाठी सर्व आंतरराष्ट्रीय सुविधायुक्त मैदान भेटणार आहे. यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निधी उपलब्ध करून देणार असल्याने, अध्यक्ष मा. आमदार रोहित दादा पवार यांचे व सर्व अपेक्स काउँसील सदस्यांचे हिंगोली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم