आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गंभीर प्रकरणातील आरोपींची जामीन मंजूर
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
20 फेब्रुवारी 2025
प्रकरणातील
सविस्तर माहिती अशी की
दि. 17/11/2024 रोजी पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे फिर्यादीने फिर्याद दिली की,
आरोपींनी फिर्यादीच्या पतीच्या भोळ्या पणाचा फायदा घेऊन, त्याला दारू पाजुन उस तोडी ठेकेदाराकडून 80,000/- रुपये घेऊन फिर्यादीच्या पतीला फक्त 2000/- रुपये दिले त्यामुळे फिर्यादीच्या पतीला खुप त्रास झाल्यामुळे फिर्यादीच्या पतीने दि 15/11/2024 रोजी घरी सिलिंग फॅन ला रंगबिरंगी साडीच्या कपड्याने फाशी घेऊन आत्महत्या केली.
तरी फीर्यादीच्या फिर्याद वरून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गु. र. नं. 780/2024 कलम 108, 3(5), भारतीय न्याय संहीता 2023 कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदरील गुन्ह्यामधील अटक आरोपी नामे विकास भगवान गवारे व सागर महादु देवकते यांनी ॲड अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत वि. जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली येथे जामिन साठी अर्ज दाखल केला होता.
सदर प्रकरणामध्ये वि. मा. जील्हा व सत्र न्यायाधीश, श्री आर व्ही लोखंडे साहेब यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून दि. 11/02/2025 रोजी दोन्ही आरोपींची जामिन मंजूर केली आहे.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख , ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख, ॲड प्रदिप लोंढे, यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख , ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.मुदस्सीर अ.रहिम, ॲड.लखन पठाडे,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,अँड रुपाली खिल्लारे मॅडम शेख आदील शेख अजीस यांनी सहकार्य केले.
إرسال تعليق