शासकीय कामात अडथळा प्रकरणी उपसरपंच सह तिघांवार गुन्हा दाखल
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
6 फेब्रुवारी 2025
हिंगोली - शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी तलाठी सिरसाठ यांच्या फिर्यादीवरून तिघांवार औंढा पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास प्रल्हाद आहेर, नालेगाव,गणेश घुगे असोला, ट्रक्टर चालक या तिघांनी संगणमत करून ट्रकटरच्या सह्याने ट्रॉली मध्ये अवेध्य गौण खनिज वाळूची चोरटी वाहतूक करताना आढळून आले. यावेळी तलाठी व त्यांच्या पथकांना आरोपीने अश्लील भाषेत शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. आणि ट्रक्टर तहसील कार्यालयात नेत असताना समोर येऊन ट्रॅक्टर अंगावर घालून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तलाठी सूर्यमाला शिरसाठ यांना तक्रारी वरून औंढा पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास श्रीधर वाघमारे हे करीत आहेत.
إرسال تعليق