श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन लाभार्थ्यांनी तात्काळ dbt करून करून घ्यावी श्रीकांत भुजबळ

श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन लाभार्थ्यांनी तात्काळ  dbt करून करून घ्यावी श्रीकांत भुजबळ 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
12 फेब्रुवारी 2025 
हिंगोली तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृती वेतन योजना अंतर्गत सर्व लाभ घेणारे लाभार्थी यांना मी श्रीकांत भुजबळ, तहसिलदार हिंगोली असे आवाहन करतो की, महाराष्ट्र शासन निर्णय सामाजिक न्याय विभाग दिनांक 19 डिसेंबर 2024 अन्वये संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत अनुदान लाभ घेणारे लाभार्थी यांना यापुढे फक्त DBT (Direct Beneficiary Transfer) थेट लाभ हस्तांतरण प्रणालीव्दारे दोन्ही योजनेचे अनुदान जमा होणार असल्यामुळे सर्व लाभार्थी यांनी आपले बैंक खाते आधार कार्ड व मोबाईल क्रमांकाशी सलंग्न करून घेणे बंधनकारक आहे.


संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत एकूण लाभार्थी 4993 असून त्यापैकी DBT झालेली लाभार्थी संख्या 4796 असून त्यावर अनुदान माहे डिसेंबर-2024 चे अनुदान शासना मार्फत DBT व्दारे वितरीत करण्यात आलेले आहे तर DBT होणे शिल्लक लाभार्थी 197 इतके आहेत.

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजने अंतर्गत एकूण लाभार्थी 5216 असून त्यापैकी DBT झालेली लाभार्थी संख्या 4466 असून त्यावर अनुदान माहे डिसेंबर-2024 चे अनुदान शासना मार्फत DBT व्दारे वितरीत करण्यात आलेले आहे तर DBT होणे शिल्लक लाभार्थी 750 इतके आहेत.

त्याअनुषंगाने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनाचे DBT न झालेले 947 एवढ्या लाभार्थ्यांना कळविण्यात येते की, आपले बँकखाते DBT नसल्यास आपले बैंक खाते आधार व मोबाईल क्रमांकाशी सलंग्न करून घेण्यासाठी संबंधीत बँकेत जाऊन NPCI फॉर्म भरून DBT करून घ्यावी व DBT झाल्यानंतर आपले आधारकार्ड झेरॉक्स, आधार सलंग्न बैंक खाते पासबुक झेरॉक्स व आधार संलग्न मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती जमा करावी. ज्या लाभार्थ्यांचे बैंक खाते दिनांक 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत DBT करणार नाहीत त्यांचे संजय गांधी निराधार अनुदान योजना / श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजने अंतर्गतचे मिळणारे अनुदान यापुढे जमा होणार नाही याची प्रामुख्याने नोंद घ्यावी.
असे आवाहन
श्रीकांत भुजबळ  तहसीलदार हिंगोली यांनी केले आहे 

Post a Comment

أحدث أقدم