कर्तव्यात कसूर वडदची ग्रामसेविका सरिता मुकने निलंबित

कर्तव्यात कसूर वडदची ग्रामसेविका सरिता मुकने निलंबित

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
24 मार्च 2024
हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यातील वडद ग्रामपंचायती च्या ग्रामसेविकेला कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून निलंबीत करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश औंढा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी नुकतेच काढले आहेत.

औंढा नागनाथ तालुक्यातील वडद ग्रामपंचायत्तीमध्ये कार्यरत ग्रामसेविका सरीता मुकने हाांच्या विरोधात गावकऱ्यांनी तक्रार केली होती. यामध्ये त्यांनी पंधराव्या वित्त आयोोगाच्या कामात सन २०२३-२४ व सन २०२४-२५ या वर्षात कामे न करताच निधीचा अपहार केल्याच्या आरोप करण्यात आला होता. या आरोपानंतर पंचायत समिती कार्यालयाने विस्तार अधिकारी एस. एम. आमले, आर. एस. बर्वे यांचे पथक नियुक्त करून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होत. त्यानुसार सदर पथक चौकशीसाठी गेले असतांना त्यांना चौकशीसाठी अभिलेखे सादर
करण्यात आले नाही.
 त्यामुळे या पथकाने अभिलेखे सादर केले नसल्याचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर पंचायत समितीने ता. १५ जानेवारी व ता. १८ फेब्रुवारी रोजी ग्रामसेविका मुकने यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. दरम्यान, वरिष्ठाच्या आदेशाचे पालन न करणे, १५ व्या वित्त आयोगामधे कामे न करता निधीचा अपहार करणे, चौकशीसाठी अभिलेखे सादर न करणे यावरून कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून येत असल्याचे नमुद करून त्यांना निलंबीत करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश गुरुवारी  काढण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग राहणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे. तसेच उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचेही या आदेशात नमुद केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم