अल्पवयीन मुलास खुन होण्याच्या संकटात सापडेल या उद्देषाने अपहरण केल्या प्रकाणातील आरोपींची निर्दोष मुक्तता
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
25मार्च2025
घटनेची
सविस्तर माहिती अशी की
दि. 23/02/2014 रोजी पोलीस स्टेशन आखाडा बाळापुर येथे फिर्यादीने फिर्याद दिली की, दि.20/02/2014 आरोपींनी संगनमताने फीर्यादीच्या रखवालीतून त्याच्या अल्पवयीन मुलाला त्याच्या जिवाचे बरेवाईट करण्याच्या किंवा खुन होण्याच्या संकटात सापडेल या उद्देशाने अपहरण केले.
तरी फिर्यादीच्या फिर्यादिवरून पोलीस स्टेशन अखाडा बाळापुर येथे गु.र. न. 13/2014 कलम 363, 364, 34 भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदर प्रकरणामध्ये वि जिल्हा व सत्र न्यायलय हिंगोली येथे सत्र खटला क्र 28/2014 अन्वये दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.
तरी सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे अनेक साक्षीदार तपासण्यात आले आणि या प्रकरणतील आरोपी, 1) शेख इस्माईल शेख इब्राहीम व 2) मीना बाई परसराम चव्हाण यांच्या वतीने वतीने ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी काम पाहिले.
दिनांक 28/02/2025 रोजी विद्यमान न्यायधिश मा. आर. व्ही. लोखंडे साहेब यांनी दोन्ही पक्षांचा अंतिम युक्तीवाद एकून आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख , ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख , ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.मुदस्सीर अ.रहिम, ॲड.लखन पठाडे,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,अँड रुपाली खिल्लारे मॅडम शेख आदील शेख अजीस यांनी सहकार्य केले.
إرسال تعليق