कारवाईस गेलेल्या महिला पोलिसांना मारहाण
पाच जनावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
13 जून 2025
हिंगोली जिल्ह्यातील वसमत
शहरातील सोमवार पेठ भागात अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्याकरीता गेलेल्या पोलिस महिलेला मारहाण करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी ११ जूनला पाच जणांवर वसमत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जिल्ह्यात अवैध दारू विक्रीवर परिणामकारक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण
कोकाटे यांनी जिल्ह्यातील १३ हीपोलिस ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकाला दिल्या आहेत. त्यानुसार अनेक ठिकाणी कारवाईचे सत्र सुरू आहे. वसमत शहरातील सोमवार पेठ भागात एका घरामध्ये बेकायदेशीर दारूचे गाळप करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती वसमत शहर पोलिसांना मिळाल्याने पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक बालाजी महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस कर्मचारी अंबुताई चव्हाण यांचे पथक ११ जूनला सायंकाळी कारवाईसाठी गेले
होते. त्यांनी सदर घरावर छापा मारताच एका व्यक्तीसह चार महिलांनी महिला पोलिस कर्मचारी चव्हाण यांना शिवीगाळ करून घरामध्ये जाण्यास मज्जाव केला. तसेच त्यांचा हात पिनगाळून त्यांना मारहाण केली. या प्रकरणी चव्हाण यांनी वसमत शहर पोलिसात रात्री उशिरा दिलेल्या तक्रारीवरून शांताबाई पवार, जया पवार, राणी पवार, रूपा पवार यांच्यासह रमेश पवार या पाच जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक साहेबराव कसबेवाड हे करीत आहेत.
إرسال تعليق