कानरखेडा खुर्द येथे विज पडून महिलेचा मृत्यू
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
13 जून 2025
हिंगोली जिल्ह्यातील कानरखेडा खुर्द येथील महिला सौ बेबी राजू सावके वय 45 वर्ष ही आपल्या घरच्या शेतात गट नं ७२ मध्ये काडीकचरा वेचण्यासाठी आपल्या जाऊबाई सोबत गेली असता अचानक शुक्रवारी दुपारी एकच्या दरम्यान जोरदार पाऊस व वीजां चा कडकडाट चालू असताना सदरील महिला आपल्या शेतातील एका पळसाच्या झाडाजवळ उभी राहिले असतात त्या ठिकाणी अचानक वीज पडल्याने महिला जागेवर मृत्यू झाला या महिलेसोबत असलेल्या तिच्या जाऊबाई ने शेताच्या आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बोलावले त्यानंतर महिले ला उचलून रस्त्यावर आणले व त्यानंतर त्या ठिकाणाहून वाशिम येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले व त्यानंतर शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या स्वाधीन केले
बेबीबाई राजु सावके यांना दोन मुले व दोन मुली पती व सासु आ सा परिवारआहे बेबीबाई च्या मृत्यूने कानरखेडा गावात दुःखाचा डोंगर पसरला आहे
إرسال تعليق