भीमा कोरेगाव विजयस्तंभ बचाव समितीच्या हिंगोली जिल्हा अध्यक्ष पदी बंडू नरवाडे
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
21 जून 2025
हिंगोली.भीमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी सरकार अनेक वेळा निधीची घोषणा करीत असले तरी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने कसलाही विकास करता येणार नाही म्हणून प्रथम न्यायालयाचा खटला जिंकणे ही आपली सर्वांची पहिली आणि सामुहिक जबाबदारी आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात व राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी व हा लढा समाजभिमुख व्हावा म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. न्यायालयाचा खटला गतिमान व्हावा आणि लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आलेली असून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या हिंगोली जिल्हा अध्यक्ष या पदावर आयु. बंडू नरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली असून ते मागील अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत काम करीत आहे. आयु. बंडू नरवाडे यांनी हिंगोली जिल्ह्यातील सामाजिक प्रश्नांवर करून अनेक घटनांना सामाजिक न्याय मिळवून दिला आहे. महापुरुषांच्या विचारधारेचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून विद्यार्थी शिष्यवृत्ती स्वाधार निवेदने दिली. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात ते मागील काही दिवसांपासून सक्रिय सहभागी आहेत. या ऐतिहासिक न्यायालय लढ्यात बंडू नरवाडे जनजागृतीचे काम तन, मन आणि आपले सर्वस्व लावून करतील अशी अपेक्षा आहे हिंगोली जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
إرسال تعليق