स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत आरोग्य शिबिर हिंगोलीत 107 महिलांची आरोग्य तपासणी

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत आरोग्य शिबिर — हिंगोलीत 107 महिलांची आरोग्य तपासणी

 महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
  20 सप्टेंबर2025

19 सप्टेंबर रोजी हिंगोली शहरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, मस्तानशहा नगर येथे "स्वस्थ नारी सशक्त परिवार" या अभियानाअंतर्गत विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या हस्ते झाले.
या विशेष शिबिरात महिलांसाठी एकूण 20 प्रकारच्या आरोग्य सेवांचा लाभ देण्यात आला असून, एकूण 107 महिलांची तपासणी करण्यात आली. या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण आरोग्याविषयी जनजागृती आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खालील मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते:
डॉ. पांडुरंग फोपसे — सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. गणेश जोगदंड — तालुका आरोग्य अधिकारी व अभियान नोडल अधिकारी
डॉ. पुंडगे, डॉ. साक्षी मारकड, डॉ. शेख आतिफ, डॉ. रणजीत मस्के  वैद्यकीय अधिकारी
मारोतराव पोले, रामेश्वर रोडे, हर्ष मनोहर, शैलेश मुदडा, नाक्षण भालेराव, शेख अनवर, रवींद्र भालेराव, प्रदीप आंधळे, पंजाब गायकवाड, मारुती सोलापूर, सय्यद इब्राहम, प्रसाद कुलकर्णी, दीपक पवार, विशाल लोखंडे, गणेश ठोके, राहुल राठोड, प्रियंका राठोड, सुनीता सुपलकर, शितल सानप, निहा अमरावतीकर, सुनिता इंगोले, श्रीमती मोरे मॅडम, पांडुरंग खुडे, शुभम ढवळे, विजय ठोक, सचिन इंगोले व आशा स्वयंसेविका आणि आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामार्फत महिलांच्या आरोग्याच्या क्षेत्रात एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले असून, "स्वस्थ नारी सशक्त परिवार" हे अभियान भविष्यातील अनेक महिलांसाठी आशेचा किरण ठरणार आहे असे जिल्हा आरोग्य अधिकारी कैलास शेळके यांनी महाराष्ट्र24 न्यूजला बोलताना सांगितले 

Post a Comment

أحدث أقدم