मारहाण व बलात्कार प्रकरणातील आरोपीचा जामीन मंजूर
१२ जुलै रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात न्यायालयाचा निर्णय
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
21 सप्टेंबर 2025
दि. १२ जुलै २०२५ रोजी औंढा नागनाथ पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या एका गंभीर बलात्कार व मारहाणीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालय वसमत यांनी जामीन मंजूर केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी सलमानखान साहेबखान पठाण याने तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला. तसेच दि. ०४ जुलै २०२५ रोजी तिला बेदम मारहाण केली व दि. ०९ जुलै रोजी बलात्कार करून लग्नासाठी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने विरोध दर्शवल्यानंतर तिला जिवे मारण्याची धमकीही दिली असल्याचे नमूद करण्या
त आले आहे.यावरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५१९/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६९, ७५, ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.
या प्रकरणात आरोपी सलमानखान पठाण याने जिल्हा व सत्र न्यायालय, वसमत येथे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. डी. बी. बांगडे यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून आरोपीला जामीन मंजूर केला.
या प्रकरणात आरोपीच्या वतीने प्रमुख युक्तिवाद ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी केला. त्यांना ॲड. सतिष देशमुख, ॲड. सौ. सुनिता देशमुख, ॲड. शामकांत देशमुख, ॲड. प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
सहाय्यक वकील म्हणून ॲड. शरद देशमुख, ॲड. अदित ऊर्फ शुभम देशमुख, ॲड. राहुल देशमुख, ॲड. योगेश खिल्लारी (पाटील), ॲड. अविनाश राठोड, ॲड. रजत देशमुख, ॲड. प्रकाश मगरे, ॲड. आनंद खिल्लारे, ॲड. सुमित सातव, ॲड. मुदस्सीर अ. रहिम, ॲड. लखन पठाडे, ॲड. श्रद्धा जैस्वाल, ॲड. आकाश चव्हाण, ॲड. गजानन घुगे, ॲड. सुजित गायकवाड, ॲड. सुमित कदम, ॲड. तुषार पवार, अॅड. रुपाली खिल्लारे मॅडम, शेख आदील, शेख अजीस, अॅड. तुषार देशमुख, अॅड. सचिन सोनुने आदींनी सहकार्य केले.
إرسال تعليق