182 किलो गांजा प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर.ॲड अजय उर्फ बंटी देशमुख

182 किलो गांजा प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर
ॲड अजय उर्फ बंटी देशमुख 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली प्रतिनिधी 
  लोहा (जि. नांदेड):
दि. 13 जून 2025 रोजी लोहा पोलिसांनी मौजे धर्मपुरी तांडा (मजेरी) येथील कच्च्या रस्त्यावर कारवाई करत 182 किलो 700 ग्रॅम गांजा (किंमत अंदाजे ₹9,13,500/-) व बोलेरो चारचाकी वाहन (किंमत ₹5,00,000/-) असा एकूण ₹14,13,500/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करत दोन आरोपींना अटक केली होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या माधव विठ्ठल जाधव याला जिल्हा व सत्र न्यायालय, कंधार यांनी दि. 8 सप्टेंबर 2025 रोजी जामीन मंजूर केला आहे.

लोहा पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, पोलीस पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. या प्रकरणी गु. र. क्र. 167/2025 अन्वये एन.डी.पी.एस. कायदा कलम 8 (c), 20 (b)(ii)(C), 29 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

जामिनासाठी आरोपीच्या वतीने ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून, आरोपीला नियमीत जामीन मंजूर केला.

या खटल्यात ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. सतिष देशमुख, ॲड. शामकांत देशमुख, ॲड. प्रदीप देशमुख, ॲड. प्रदीप लोंढे यांचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय ॲड. शरद देशमुख, ॲड. अदित (शुभम) देशमुख, ॲड. राहुल देशमुख, ॲड. योगेश खिल्लारी (पाटील), ॲड. अविनाश राठोड, ॲड. रजत देशमुख, ॲड. प्रकाश मगरे, ॲड. आनंद खिल्लारे, ॲड. सुमित सातव, ॲड. मुदस्सीर अ. रहिम, ॲड. लखन पठाडे, ॲड. श्रद्धा जैस्वाल, ॲड. आकाश चव्हाण, ॲड. शुभम मुदिराज, ॲड. गजानन घुगे, ॲड. सुजित गायकवाड, ॲड. सुमित कदम, ॲड. तुषार पवार, अ‍ॅड. रुपाली खिल्लारे मॅडम, शेख आदील शेख अजीस, ॲड. तुषार देशमुख, ॲड. सचिन सोनुने यांनी सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم