हिंगोली शहरात डीजेचा आवाज जोरात वाजवणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल



हिंगोली शहरात डीजेचा आवाज जोरात वाजवणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

हिंगोली, दि. ७ सप्टेंबर २०२५ :
पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात डीजेच्या आवाजाचा बेसुमार त्रास सुरू असतानाच, हिंगोली शहर पोलिसांनी डीजेचा आवाज जाणीवपूर्वक मोठ्याने वाजवणाऱ्या चालकावर कठोर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार दि. ६ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री गांधीचौक ते 

वजारवाडा पोळा मारोती मंदिर परिसरात घडला.


वाहन चालकावर गुन्हा दाखल

फिर्यादी विक्की भगवानराव उरेवार (वय ३४), पोलीस अंमलदार  हिंगोली शहर पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांनी नमूद केले की, MH 04 CU 8612 क्रमांकाच्या वाहनातील डीजे चालक/मालक जनार्धन बाबुराव मुळे, रा. संभाजीनगर यांनी पोलिसांच्या स्पष्ट सूचना देऊनही डीजेचा आवाज कमी न करता तो अधिक तीव्रतेने वाजवला.


पोलीस सूचना धुडकावल्या

सदर चालकाला सार्वजनिक त्रास टाळण्यासाठी डीजेचा आवाज कमी ठेवण्यास स्पष्टपणे सांगण्यात आले होते. मात्र, त्याने पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत जाणूनबुजून नियम झुगारले, आणि गांधीचौक ते वजारवाडा परिसरात सुमारे १ किमी परिसरात जोरात डीजे वाजवून नागरिकांना त्रास दिला, असे तक्रारीत म्हटले आहे.


गुन्हा नोंदवलेले कलमे

या प्रकरणी हिंगोली शहर पोलिसांनी खालीलप्रमाणे गुन्हा क्रमांक 683/2025 नोंदवला असून, आरोपीविरुद्ध कलम 223 भादंवि, सहकलम 134, 33(R), 3.68/140 मोटार वाहन अधिनियम, तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत कलम 15 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.


पोलिसांचा इशारा – डीजे चालकांची गय केली जाणार नाही

यासंदर्भात पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांनी सांगितले की,

"शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी स्पष्ट नियम लागू केले आहेत. डीजेच्या आवाजावर निर्बंध असूनही जाणीवपूर्वक उल्लंघन करणाऱ्या चालकांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. यापुढे डीजे चालकांची गय केली जाणार नाही."


शहरवासीयांचा सकारात्मक प्रतिसाद

या कारवाईमुळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, सणासुदीच्या काळात देखील कायद्याचे पालन सर्वांनी करावे, असा संदेश पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Post a Comment

أحدث أقدم