सामाजिक कार्यकर्त्या वंदना गायकवाड यांची भाजपा OBC महिला शहराध्यक्षपदी निवड

सामाजिक कार्यकर्त्या वंदना गायकवाड यांची भाजपा OBC महिला शहराध्यक्षपदी निवड

हिंगोली, दि. १२ ऑक्टोबर 
महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क 
सामाजिक कार्यात सक्रिय व महिलांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. वंदना गायकवाड यांची भारतीय जनता पार्टीच्या OBC महिला शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. या निमित्ताने आज  दिनांक 12 ऑक्टोंबर रोजी  आमदार मुटकुळे यांच्या निवासस्थानी  झालेल्या कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्र जिल्हाध्यक्ष गजाननराव दादा घुगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी हिंगोली विधानसभा आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब, माजी जिल्हाध्यक्ष फुलाजी  शिंदे, नगराध्यक्ष बाबारावजी बांगर, आमदार रामरावजी वडकुते, ओबीसी जिल्हाध्यक्ष शशिकांत भाऊ वडकुते, रजनीताई पाटील, पूजा गाडे, स्मिता साहू, मीरा सूर्यवंशी, मंदाकिनी चव्हाण, मीनाक्षी पुरी, रेखा जाहीरराव यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवड झाल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना वंदना गायकवाड म्हणाल्या, “भारतीय जनता पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्नशील राहीन. पक्ष संघटना बळकट करण्याबरोबरच समाजातील दुर्बल घटकांपर्यंत पोहोचून महिलांना सक्षम बनविण्याचे काम प्राधान्याने करणार आहे. महिलांनी स्वावलंबी बनावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे, यासाठी विविध उपक्रम राबविले जातील.”
पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन करत आगामी काळात त्यांनी पक्षाचे ध्येय–धोरणे समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवावीत, असा विश्वास व्यक्त केला.

Post a Comment

أحدث أقدم