हिंगोली महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतील ३५ कोटी २२ लाख ८८ हजार ३३३ रुपयांच्या अपहार प्रकरणात संचालिकेला अटकपूर्व जामीन

हिंगोली महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतील ३५ कोटी २२ लाख ८८ हजार ३३३ रुपयांच्या अपहार प्रकरणात संचालिकेला अटकपूर्व जामीन

महाराष्ट24न्यूज नेटवर्क 
30 डिसेंबर 2025
हिंगोली :
हिंगोली येथील हिंगोली महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्या. हिंगोली या संस्थेमध्ये झालेल्या ३५ कोटी २२ लाख ८८ हजार ३३३ रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणात आरोपी संचालिका रागिनी नितीन खर्जुले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली यांनी मंजूर केला आहे.
फिर्यादीने दिनांक १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत न्यायालयात CRI M.A. 28/2025 अन्वये अर्ज दाखल केला होता. सदर अर्जावर दंड प्रक्रिया संहिता कलम १५६(३) प्रमाणे चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गुन्हा क्रमांक ६४०/२०२५ दाखल करण्यात आला.
वरिष्ठांच्या आदेशानुसार, हिंगोली महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. हिंगोली येथील संचालक, पासिंग ऑफिसर, रोखपाल, व्यवस्थापक व इतर कर्मचारी यांच्याविरोधात ३५ कोटी २२ लाख ८८ हजार ३३३ रुपयांच्या आर्थिक नुकसानीबाबत दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी फिर्याद दाखल करण्यात आली होती.
फिर्यादीप्रमाणे, आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता कलम १२०(ब), ४०८, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ तसेच एमपीआयडी अधिनियम १९९९ चे कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात आरोपी संचालिका रागिनी नितीन खर्जुले यांनी दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली येथे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकून विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश मॅडम, हिंगोली यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.
आरोपीच्या वतीने अ‍ॅड. जी. के. गायकवाड पाटील यांनी प्रभावी युक्तिवाद केला, तर अ‍ॅड. ओम पतंगे व अ‍ॅड. गणेश खिल्लारी यांनी सहकार्य केले.
ही संपूर्ण न्यायालयीन कार्यवाही अ‍ॅड. पी. व्ही. नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या निर्णयामुळे हिंगोली जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात मोठी चर्चा सुरू असून, पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने