हिंगोलीत पतंगाच्या मांजाने तरुणाचा डोळा निकामीदुचाकीवर पत्नी-मुलासह जात असताना दुर्घटना; पत्नीच्या पायालाही दुखापत

हिंगोलीत पतंगाच्या मांजाने तरुणाचा डोळा निकामी
दुचाकीवर पत्नी-मुलासह जात असताना दुर्घटना; पत्नीच्या पायालाही दुखापत

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
14 जानेवारी 2026
हिंगोली | प्रतिनिधी
हिंगोली शहरात पतंगाच्या मांजामुळे गंभीर अपघात घडल्याची घटना समोर आली असून, या दुर्घटनेत एका तरुणाचा डोळा निकामी झाला आहे. प्रवीण देवीदास शिखरे (वय अंदाजे …43, रा.हिंगोली  असे जखमी तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रवीण शिखरे हे आपल्या पत्नी व लहान मुलासह दुचाकीवरून शहरातील रस्त्यावरून जात असताना अचानक पतंगाचा मांजा त्यांच्या चेहऱ्यावर आदळला. धारदार मांजाने थेट त्यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. या अपघातात त्यांच्या पत्नीच्या पायालाही मांजामुळे दुखापत झाली आहे.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना उपचारासाठी हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत प्रवीण शिखरे यांच्या डोळ्याला गंभीर स्वरूपाची इजा झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांचा डोळा निकामी झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पत्नीवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना हिंगोली शहरात घडली असून, पतंग उडवताना वापरल्या जाणाऱ्या नायलॉन व चायनीज मांजामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही अशा मांजामुळे अनेक अपघात व जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान, प्रशासनाने व पोलीस यंत्रणेने नागरिकांना पतंग उडवताना सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन केले असून, बंदी असलेल्या मांजाच्या विक्री व वापरावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم