जीवे मारण्याच्या उद्देशाने झालेल्या मारहाण प्रकरणात आरोपी गणेश हरण यांचा अटकपूर्व जामीन मंजूर


जीवे मारण्याच्या उद्देशाने झालेल्या मारहाण प्रकरणात आरोपी गणेश हरण यांचा अटकपूर्व जामीन मंजूर
ॲड जी के गायकवाड पाटील 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
17 जानेवारी 2020 
सेनगाव तालुक्यातील गाजलेल्या मारहाण प्रकरणात विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली येथील मा. न्यायमूर्ती देशमुख साहेब यांनी आरोपी गणेश शंकर हरण यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केल्याने या प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 31/12/2025 रोजी फिर्यादीने सेनगाव पोलीस स्टेशन, जिल्हा हिंगोली येथे तक्रार दाखल केली होती. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, करण हरण, प्रकाश हरण, गणेश हरण, केशव हरण, अर्जुन हरण, शंकर हरण, लक्ष्मी हरण, अश्विनी हरण व शिवकन्या हरण (सर्व राहणार धुमाळ गल्ली, सेनगाव, ता. सेनगाव, जि. हिंगोली) यांनी एकत्र येत जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकू व दगडी विटांचा वापर करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता.
या तक्रारीवरून सेनगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 586/2025 अन्वये कलम 109 (307), 118(1), 125, 189(2), 190, 191(2)(3), 351(2)(3), 352 बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात अटक होण्याच्या भीतीने आरोपी गणेश शंकर हरण यांनी दिनांक 06/01/2026 रोजी विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली येथे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सदर अर्जावर दिनांक 15/01/2026 रोजी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा सखोल युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला.
आरोपीच्या वतीने ॲड. जी. के. गायकवाड पाटील यांनी प्रभावी युक्तिवाद मांडला. त्यांना ॲड. ओम पतंगे, ॲड. परमेश्वर इंगोले जवळेकर व ॲड. रवी कडतीकर यांनी सहकार्य केले.
या निर्णयामुळे संबंधित प्रकरणात कायदेशीर प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांकडे सर्वांचे लक्ष लागले असून, सेनगाव परिसरात या आदेशाची चर्चा होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم