पोलीस असल्याचे सांगून वृद्ध शेतकऱ्याची सोन्याची दागिने लुटली; हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 पोलीस असल्याचे सांगून वृद्ध शेतकऱ्याची सोन्याची दागिने लुटली; हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
12 मार्च 2026
हिंगोली  पोलीस असल्याचे सांगून एका वृद्ध शेतकऱ्याची सुमारे १ लाख २९ हजार रुपयांची सोन्याची दागिने लुटल्याची घटना गुरुवारी (दि.१२ मार्च) सकाळी कळमनुरी–हिंगोली रोडवर घडली. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम रामजी हरण (वय ७३, व्यवसाय शेती, रा. सावरखेडा ता. जि. हिंगोली) हे गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास कळमनुरी–हिंगोली रोडवरील दराडे हॉटेल समोरील रस्त्यावरून आपल्या वाहनाने जात होते. यावेळी बिट क्रमांक ०२ च्या हद्दीत दोन अनोळखी इसमांनी त्यांना थांबवले.
त्या इसमांनी आपण पोलीस असल्याची बतावणी करून “समोर लुटमारीची घटना झाली आहे, तुम्ही असे सोन्याचे दागिने घालून कसे फिरता?” असे सांगितले. त्यानंतर त्यांनी तुकाराम हरण यांच्या गळ्यातील सुमारे ३.५ तोळे वजनाचा सोन्याचा गोफ (अंदाजे किंमत १,०५,००० रुपये) व हातातील पांढऱ्या रंगाचा खडा असलेली सुमारे ८ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (अंदाजे किंमत २४,००० रुपये) काढून घेतली.
सदर दागिने रुमालात गुंडाळून ते वाहनाच्या डिकीत ठेवत असल्याचे भासवून आरोपींनी तेथून काढता पाय घेतला. काही वेळाने फिर्यादी तुकाराम हरण यांना संशय आल्याने त्यांनी वाहनाची डिकी उघडून पाहिले असता रुमालात ठेवलेले दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
या घटनेत एकूण १ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. या प्रकरणी दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा क्र. १४६/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम २०४, ३१९ (२), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी 
 घटनास्थळी  पंचनामा करून 
आरोपीच्या शोधासाठी पथके तैनात  करण्यात आले 

Post a Comment

أحدث أقدم