हिंगोली : १० कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात सोसायटीच्या माजी सचिव अर्चना खर्जुले यांना जामीन मंजूर
12 मार्च 2026
हिंगोली : शहरातील बहुचर्चित खर्जुले कुलस्वामीनी महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या सुमारे १० कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील आरोपी अर्चना कैलास खर्जुले यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. दि. ७ मार्च २०२६ रोजी हिंगोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या वि. सत्र न्यायाधीश सौ. एस. एन. माने यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा आदेश दिला.
या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, सोसायटीचे लेखपाल संजय सिताराम जाजू यांनी दि. ६ डिसेंबर २०२३ रोजी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दिली होती. त्यानुसार खर्जुले कुलस्वामीनी महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या संचालक मंडळाने एकूण ४,८१० ठेवीदारांना जास्त परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जमा केलेली तब्बल १०,६८,४१,४३३ रुपयांची रक्कम अपहार करून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता.
या फिर्यादीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९३४/२०२३ दाखल करण्यात आला असून भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४०८, ४०९, १२० (ब) तसेच एमपीआयडी कायदा कलम ३ व ४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणात सोसायटीच्या सचिव असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या आरोपी अर्चना कैलास खर्जुले यांनी जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली येथे ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून वि. सत्र न्यायाधीश सौ. एस. एन. माने यांनी आरोपीचा जामीन मंजूर केला.
आरोपीच्या वतीने ॲड. सतीश देशमुख, ॲड. शामकांत देशमुख आणि ॲड. प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी युक्तिवाद केला.
त्यांना ॲड. शरद देशमुख, ॲड. अदित उर्फ शुभम देशमुख, ॲड. राहुल देशमुख, ॲड. योगेश खिल्लारी (पाटील), ॲड. रजत देशमुख, ॲड. प्रकाश मगरे, ॲड. आनंद खिल्लारे, ॲड. सुमित सातव, ॲड. मुदस्सीर अ. रहिम, ॲड. लखन पठाडे, ॲड. श्रद्धा जैस्वाल, ॲड. आकाश चव्हाण, ॲड. गजानन घुगे, ॲड. सुजित गायकवाड, ॲड. सुमित कदम, ॲड. तुषार पवार, ॲड. रुपाली खिल्लारे, ॲड. अविनाश राठोड, ॲड. प्रिया कुरील, शेख आदिल शेख अजीस, ॲड. सचिन सोनुने, ॲड. संदीप डवले, ॲड. शिवम देशमुख, ॲड. हरपालसिंग सेठी व ॲड. महावीरसिंग चौहान यांनी सहकार्य केले
إرسال تعليق