हिंगोली-वाशिम मार्गावर बैलांची निर्दयी वाहतूक; तीन आरोपींवर गुन्हा दाखल

हिंगोली-वाशिम मार्गावर बैलांची निर्दयी वाहतूक; तीन आरोपींवर गुन्हा दाखल

हिंगोली, दि. 16 मार्च 2026 : हिंगोली ते वाशिम रोडवरील खुराणा एम.बी.बी.एस. कॉलेजसमोर पोलिसांनी केलेल्या कारवाईत बैलांची निर्दयीपणे वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आज सकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंडबा मुकिंदा मगरे (वय 48), पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींनी बैलांना दाटीवाटीने व निर्दयीपणे पिकअप वाहनात कोंबून वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोन पिकअप वाहने अडवली.
या कारवाईत पोलिसांनी चार बैल आणि दोन पिकअप वाहने जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 10 लाख रुपये इतकी आहे. आरोपींकडे बैलांच्या वाहतुकीसाठी आवश्यक परवाना, कागदपत्रे व पशुवैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचेही तपासात समोर आले आहे. तसेच सदर बैलांची कत्तलीसाठी निर्दयीपणे वाहतूक केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी जब्बारखों सत्तारखॉ पठाण (वय 36), शेख वाहीद शेख मुक्तार (वय 26) आणि शेख शाहिद शेख मुक्तार (वय 27, सर्व रा. वाशिम) यांच्याविरुद्ध प्राण्यांवरील क्रूरतेस प्रतिबंध अधिनियम 1960 आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
 असून पुढील तपास 
पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली 
 पोलीस हवालदार राजकुमार जमधाडे करत आहेत. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Post a Comment

أحدث أقدم