बहुचर्चित लाच मागणी प्रकरणातील मुख्याध्यापकास जामीन मंजूरॲड अजय उर्फ बंटी देशमुख

बहुचर्चित लाच मागणी प्रकरणातील मुख्याध्यापकास जामीन मंजूर
ॲड अजय उर्फ बंटी देशमुख 

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
१५ मार्च 2026
हिंगोली बहुचर्चित लाच मागणी प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक संतोष बबनराव कढणे यांना हिंगोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. 05 मार्च 2026 रोजी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 138/2026 अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम 7 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणात तक्रारदार असलेल्या एका शिक्षकाने तक्रार दिली होती की, मधोमती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, लाख ता. औंढा जि. हिंगोली येथील मुख्याध्यापक संतोष बबनराव कढणे यांनी तक्रारदारास मिळालेल्या घरभाडे भत्त्याच्या रकमेपैकी पन्नास टक्के रक्कम मागितली होती.
तक्रारीनुसार, घरभाडे भत्त्यातील रकमेपैकी ₹28,000/- रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपाच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपी मुख्याध्यापक संतोष बबनराव कढणे यांना अटक केली होती.
दरम्यान, आरोपीच्या वतीने ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली येथे जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणात मा. न्यायाधीश श्रीमती एस. एन. माने यांनी दि. 11 मार्च 2026 रोजी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीला नियमित जामीन मंजूर केला.
आरोपीच्या वतीने ॲड. सतीश देशमुख, ॲड. शामकांत देशमुख, ॲड. प्रदीप देशमुख, ॲड. बाळासाहेब कुटे, ॲड. प्रदीप लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
या वेळी त्यांना ॲड. शरद देशमुख, ॲड. अदित उर्फ शुभम देशमुख, ॲड. राहुल देशमुख, ॲड. योगेश खिल्लारी (पाटील), ॲड. रजत देशमुख, ॲड. प्रकाश मगरे, ॲड. आनंद खिल्लारे, ॲड. सुमित सातव, ॲड. मुदस्सीर अ. रहिम, ॲड. लखन पठाडे, ॲड. श्रद्धा जैस्वाल, ॲड. अविनाश राठोड, ॲड. प्रिया कुरील, ॲड. आकाश चव्हाण, ॲड. गजानन घुगे, ॲड. सुजित गायकवाड, ॲड. सुमित कदम, ॲड. तुषार पवार, ॲड. रुपाली खिल्लारे, शेख आदिल शेख अजीस, ॲड. सचिन सोनुने, ॲड. संदीप डवले, ॲड. शिवम देशमुख, ॲड. हरपालसिंग सेठी, ॲड. महावीरसिंग चौहान आदींनी सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم