जावयाच्या खुनाच्या गंभीर प्रकरणातील आरोपी सासरा व मेव्हण्यास जामीन मंजूर

जावयाच्या खुनाच्या गंभीर प्रकरणातील आरोपी सासरा व मेव्हण्यास जामीन मंजूर 

महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क 
25मार्च2026
हिंगोली : जावयाच्या खुनाच्या गंभीर प्रकरणातील आरोपी सासरा व मेव्हण्यास जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
सदर प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस स्टेशन बासंबा, ता. हिंगोली येथे फिर्यादीने तक्रार दाखल केली होती. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्याचा भाऊ हा आपल्या पत्नीला नांदवण्यासाठी वारंवार सासरच्यांकडे विचारणा करत होता. याच कारणावरून दिनांक 19/11/2025 रोजी दुपारी अंदाजे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या भावाच्या घरी त्याचा सासरा व मेव्हणा गेले असता त्यांच्यात वाद झाला.
वादाचे रूपांतर भांडणात होऊन आरोपी सासरा व मेव्हण्याने फिर्यादीच्या भावाच्या डोक्यावर व चेहऱ्यावर दगडाने मारहाण केली. या गंभीर मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर पोलीस स्टेशन बासंबा येथे गु.र.नं. 320/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपी साहेबराव भिवाजी कपाटे (सासरा) व गोलु उर्फ शत्रुघन साहेबराव कपाटे (मेव्हणा) यांनी जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली येथे अॅड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
या अर्जावर दिनांक 11 मार्च 2026 रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एन. माने यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला.
आरोपींच्या वतीने अॅड. सतीश देशमुख, अॅड. शामकांत देशमुख, अॅड. प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना अॅड. शरद देशमुख, अॅड. अदित उर्फ शुभम देशमुख, अॅड. राहुल देशमुख, अॅड. योगेश खिल्लारी (पाटील), अॅड. रजत देशमुख, अॅड. अविनाश राठोड, अॅड. प्रकाश मगरे, अॅड. सुमित सातव, अॅड. आनंद खिल्लारे, अॅड. मुदस्सीर अ. रहिम, अॅड. आकाश चव्हाण, अॅड. श्रद्धा जैस्वाल, अॅड. लखन पठाडे, अॅड. गजानन घुगे, अॅड. सुमित कदम, अॅड. तुषार देशमुख, अॅड. रुपाली खिल्लारे, शेख आदिल शेख अजीस, अॅड. सचिन सोनुने, अॅड. संदीप डवले, अॅड. शिवम देशमुख, अॅड. प्रिया कुरील, अॅड. हरपालसिंग सेठी, अॅड. महावीर सिंग चौहान यांनी सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم