अनिकेत दवंडे यांची राज्य जनप्रहार कामगार संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

अनिकेत दवंडे यांची राज्य उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
 २५ मार्च २०२६ (प्रतिनिधी): सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवत तसेच कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे मा. श्री. अनिकेत दवंडे यांची जनप्रहार बांधकाम कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या राज्य उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. नितीन भाऊ दवंडे यांच्या हस्ते ही निवड जाहीर करण्यात आली.
अनिकेत दवंडे यांनी गेल्या काही वर्षांपासून असंघटित कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेत त्यांच्या न्याय व हक्कांसाठी सातत्यपूर्ण लढा उभारला आहे. कामगारांच्या प्रश्नांबाबत त्यांची संवेदनशीलता, तळमळ आणि संघर्षशील वृत्ती यामुळे ते कामगारांमध्ये विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर राज्य उपाध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.
संघटनेच्या माध्यमातून असंघटित कामगारांचे प्रश्न निस्वार्थीपणे सोडवणे, त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे तसेच कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी सक्षमपणे आवाज उठवणे, अशी अपेक्षा संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच संघटनेचे ध्येय-उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आणि संघटनेची प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी ते सक्रिय योगदान देतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
ही नियुक्ती २५ मार्च २०२६ ते २४ मार्च २०२७ या कालावधीसाठी करण्यात आली असून, त्यांच्या पुढील वाटचालीस संघटनेकडून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, कामगार क्षेत्रातून अनिकेत दवंडे यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत असून, विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या प्रश्नांना अधिक बळ मिळेल आणि कामगार चळवळीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

أحدث أقدم