खरात यांची वंचित बहुजन आघाडीच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड

खरात यांची वंचित बहुजन आघाडीच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली, प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 27 मार्च रोजी हिंगोली जिल्ह्यातील (हिंगोली, कळमनुरी, सेनगाव तालुके) नव्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. या निवडीत शिवाजी कानबाराव खरात यांची जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून, ज्योतीपाल भिमराव रणवीर यांची जिल्हा महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवाजी खरात यांनी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले असून, गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी ते नेहमी तत्पर राहिले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या निवडीमुळे हिंगोली जिल्ह्यात पक्षाला नवचैतन्य मिळणार असून संघटनात्मक बळ अधिक वाढणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी प्रकाश महाडू राऊत व अंबादास सुकाजी गाडे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. संघटक म्हणून रामेश्वर राघोजी भालेराव यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली असून, कोषाध्यक्षपदी माधव शिवाजीराव सपाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रसिद्धी प्रमुख म्हणून कैलास मुंजाजी भुजंगडे यांची निवड करण्यात आली आहे.
सचिवपदी राम माणिकराव पवार, मारोती अशोकराव पंडित, शेख गणी शेख मोहम्मद, सिद्धांत प्रभाकरराव गायकवाड, शेख जाकीर शेख मोईन, गौतम महादेव थोरात आणि विनोद नानाराव नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नव्याने घोषित करण्यात आलेली कार्यकारिणी हिंगोली जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी तसेच आगामी राजकीय धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
ही माहिती पक्षाचे महासचिव किसन चव्हाण यांनी दिली.

Post a Comment

أحدث أقدم