हिंगोली जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय सन्मान — सीईओ विवेक गायकवाड यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
28 मार्च 2026
हिंगोली — जिल्हा परिषद हिंगोलीचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड (भा.प्र.से.) यांना “१५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रम” अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे हिंगोली जिल्हा परिषदेला राज्यस्तरावर विशेष ओळख मिळाली आहे.
या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हिंगोली जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी ही इतर जिल्ह्यांसाठी आदर्श ठरेल. सेवापूर्ती पुरस्कारामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा मिळते.” त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे आणि लोकाभिमुख उपक्रमांचे विशेष कौतुक केले.
जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत विविध विकासकामे, सेवा वितरणातील पारदर्शकता आणि नागरिककेंद्रित उपक्रम यामुळे सीईओ विवेक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे जिल्ह्यातील शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असून, त्याचे सकारात्मक परिणाम नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत.
राज्यभरातून हिंगोली जिल्हा परिषदेच्या कामकाजाबद्दल कौतुक होत असून, हा पुरस्कार त्या कार्याची पावती मानला जात आहे. या सन्मानामुळे जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, भविष्यातही अधिक गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला जात आहे.
إرسال تعليق