हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
11 एप्रिल 2026
हिंगोली (प्रतिनिधी): हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असून, त्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक झालेल्या या धक्क्यामुळे अनेक नागरिक घराबाहेर पडले.
प्राथमिक माहितीनुसार, हा धक्का काही सेकंदांचा होता. भूकंपाची तीव्रता मध्यम स्वरूपाची असल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यातील काही भागांमध्ये हलकी कंपने जाणवली असून, त्याचा परिणाम शेजारील भागांतही जाणवला.
यापूर्वीही हिंगोली परिसरात ४.५ रिश्टर स्केलपर्यंतचे भूकंपाचे धक्के नोंदवले गेले असून,
आज ४.७ ते प्रामुख्याने तीव्रतेचे असल्याने मोठे नुकसान झाले नाही
नुकसानाची माहिती नाही
सद्यस्थितीत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
अचानक आलेल्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी घराबाहेर येऊन सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला.
प्रशासनाचे आवाहन
प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अधिकृत माहितीकडेच लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
إرسال تعليق