हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का; नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण

हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का; नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली, दि. १२ मे २०२६ :
हिंगोली जिल्ह्यात आज सायंकाळी सुमारे ६.२६ वाजण्याच्या दरम्यान भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या धक्क्यासोबत भूगर्भातून आवाजही ऐकू आल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रात ३.४ रिश्टर स्केल इतकी झाली आहे. धक्का सौम्य स्वरूपाचा असल्याने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
अचानक झालेल्या या धक्क्यामुळे अनेक नागरिक घराबाहेर पडले होते. काही भागांमध्ये काही सेकंद कंपन जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात असून, कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेली नसल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم