शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे डॉ. भिमराव हत्तीअंबीरे यांचा ‘भीमरत्न’ पुरस्काराबद्दल गौरव

शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे डॉ. भिमराव हत्तीअंबीरे यांचा ‘भीमरत्न’ पुरस्काराबद्दल गौरव

महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क 
14 मे 2026
हिंगोली | प्रतिनिधी :
सामाजिक, शैक्षणिक व धम्मकार्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे समाजभूषण तथा संबोधी अकादमीचे अध्यक्ष डॉ. भिमराव दादा हत्तीअंबीरे यांचा हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला.
महु (मध्यप्रदेश) येथे प्रदान करण्यात आलेला प्रतिष्ठेचा ‘भीमरत्न’ पुरस्कार तसेच बुद्धगया (बिहार) येथे प्राप्त ‘सम्राट कनिष्क’ पुरस्कार मिळाल्याबद्दल हिंगोली जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व संबोधी अकादमी, हिंगोली यांच्या वतीने त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व अभिनंदनपर सत्कार करून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. हत्तीअंबीरे यांच्या सामाजिक बांधिलकीची, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची तसेच धम्मप्रसारासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची प्रशंसा केली. त्यांच्या कार्यामुळे समाजात प्रबोधनाची चळवळ अधिक सक्षम होत असून युवा पिढीला प्रेरणा मिळत असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
यावेळी बंडू नरवाडे, अक्षय इंगोले, प्रा. किशोर इंगाले, प्रकाश पठाडे, एल. आर. कांबळे, रोहीदास साखरे, बाबुराव गवळी, भगवान जगताप, शेषेराव जल्हारे, बाळू किर्तन, शशिकांत हत्तीअंबीरे, गौतम श्रावणे, दीपक जाधव, मुरलीधर ढेबरे, बासा भराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते. उपस्थितांनी डॉ. भिमराव हत्तीअंबीरे यांना पुढील सामाजिक व धम्मकार्याकरिता शुभेच्छा देत त्यांच्या कार्यास सलाम व्यक्त केला.

Post a Comment

أحدث أقدم