वडिलांच्या हत्येप्रकरणी आरोपी मुलाला जामीन मंजूर
अँड बंटी देशमुख
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
15 मे 2026
हिंगोली | प्रतिनिधी
कळमनुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वडिलांच्या हत्येप्रकरणातील आरोपी मुलाला जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
प्रकरणातील सविस्तर माहिती अशी की, दि. 16 डिसेंबर 2025 रोजी कळमनुरी पोलीस ठाण्यात फिर्यादी सखाराम उर्फ सोनु शेषराव पतंगे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या वडिलांचा अज्ञात व्यक्तीने कुऱ्हाडीसारख्या धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून खून केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. त्यानुसार पोलीस स्टेशन कळमनुरी येथे गुरनं. 646/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, पोलिस तपासादरम्यान फिर्यादी सखाराम उर्फ सोनु शेषराव पतंगे यांच्यावरच खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून आरोपी केले होते.
या प्रकरणात आरोपी सखाराम उर्फ सोनु शेषराव पतंगे यांनी जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली येथे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आरोपींच्या वतीने ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी न्यायालयात बाजू मांडली.
दि. 07 मे 2026 रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री टी. एस. अकाली यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.
या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. सतिष देशमुख, ॲड. शामकांत देशमुख, ॲड. प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. शरद देशमुख, ॲड. अदित ऊर्फ शुभम देशमुख, ॲड. राहुल देशमुख, ॲड. योगेश खिल्लारी (पाटील), ॲड. रजत देशमुख, ॲड. आकाश चव्हाण, ॲड. अविनाश राठोड, ॲड. प्रकाश मगरे, ॲड. सुमित सातव, ॲड. आनंद खिल्लारे, ॲड. श्रद्धा जैस्वाल, ॲड. लखन पठाडे, ॲड. अ. मुदस्सीर अ. रहिम, ॲड. गजानन घुगे, ॲड. सुमित कदम, ॲड. तुषार देशमुख, ॲड. रुपाली खिल्लारे, शेख आदिल शेख अजीज, ॲड. सचिन सोनुने, ॲड. संदीप डवले, ॲड. शिवम देशमुख, ॲड. प्रिया कुरील, ॲड. हरपालसिंग सेठी व ॲड. महावीरसिंग चौहान यांनी सहकार्य केले.
إرسال تعليق