शहाजी उमाप यांची हिंगोली पोलीस घटकास भेट; नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत दिल्या तात्काळ कार्यवाहीच्या सूचना

शहाजी उमाप यांची हिंगोली पोलीस घटकास भेट; नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत दिल्या तात्काळ कार्यवाहीच्या सूचना

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
27 मे 2026 
हिंगोली : नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी हिंगोली जिल्हा पोलीस घटकास भेट देत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना तसेच गुन्हे उघडकीस आणण्याच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी आयोजित मासिक गुन्हे आढावा बैठकीत त्यांनी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणेदार व शाखाप्रमुखांना आवश्यक सूचना दिल्या.
बैठकीदरम्यान पोलीस स्टेशन स्तरावरील अडीअडचणी, मनुष्यबळ, तपास कार्यातील अडथळे तसेच नागरिकाभिमुख पोलीसिंग अधिक प्रभावी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. प्रत्येक पोलीस ठाण्याने गुन्हे प्रतिबंधक उपाययोजनांवर अधिक भर देत नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी सक्रिय राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
हिंगोली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हे निर्गती, प्रतिबंधक कारवाया तसेच विविध पोलीस उपक्रमांचा आढावा घेतल्यानंतर हिंगोली पोलीस घटकाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत अधिक सक्षम व परिणामकारक काम करण्यासाठी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
दुपारच्या सत्रात आयोजित नागरिक संवाद कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांची प्रत्यक्ष भेट घेत आपल्या अडीअडचणी, तक्रारी व समस्या मांडल्या. नागरिकांशी मनमोकळा संवाद साधत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी हिंगोली जिल्ह्यातील गुन्हे प्रिव्हेन्शन व डिटेक्शन संदर्भातील कामकाजाचा आढावा सादर केला. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेने केलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत आगामी काळात आणखी प्रभावी कामगिरी करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
सदर बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार केंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुंदन कुमार वाघमारे, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक श्री मयूर रसाळ, होम डीवायएसपी श्री दत्ता केंद्रे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेदार व शाखाप्रमुख उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم