पिंपरी (बुद्रुक) येथे वीज पडून १५ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यूकळमनुरी तालुक्यातील पिंपरी (बुद्रुक) गावावर शोककळा

पिंपरी (बुद्रुक) येथे वीज पडून १५ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू
कळमनुरी तालुक्यातील पिंपरी (बुद्रुक) गावावर शोककळा

महाराष्ट्र 24 न्यूज  नेटवर्क 
26 मे 2026
 हिंगोली | प्रतिनिधी
कळमनुरी तालुक्यातील पिंपरी (बुद्रुक) येथे मंगळवारी  दुपारी अचानक झालेल्या पावसासह विजेच्या कडकडाटात एका १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मृत मुलाचे नाव आनंद  नागोराव जाधव (वय अंदाजे १५ वर्षे, रा. पिंपरी बुद्रुक, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) असे असून तो नववी इयत्तेत शिक्षण घेत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास परिसरात अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यानंतर जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाला सुरुवात झाली. याच दरम्यान सुभाष याच्यावर वीज कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला. ग्रामस्थांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली; मात्र त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे समजले.

या या घटनेत एक महिला गंभीर जखमी असून तिचा नांदेड येथे रुग्णालय मध्ये  उपचार सुरू आहे 
या दुर्दैवी घटनेमुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. गावातील नागरिक, नातेवाईक व मित्रपरिवाराकडून आनंदला श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
अचानक बदलणारे हवामान आणि विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

أحدث أقدم