हिंगोली पोलीस दलात मोठे फेरबदल : ३९ पोलीस अंमलदारांची विविध ठिकाणी तैनाती पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांचे आदेश

हिंगोली पोलीस दलात मोठे फेरबदल : ३९ पोलीस अंमलदारांची विविध ठिकाणी तैनाती
पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांचे आदेश

हिंगोली, दि. २९ मे : जिल्हा पोलीस दलातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, शिस्तबद्ध व प्रभावी करण्याच्या उद्देशाने हिंगोली पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मोठ्या प्रमाणावर पोलीस अंमलदारांच्या तैनातीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे, उपविभागीय कार्यालये तसेच मोटार परिवहन विभागातील एकूण ३९ पोलीस अंमलदारांची पुढील आदेशापर्यंत नवीन ठिकाणी तैनाती करण्यात आली आहे.
या फेरबदलामध्ये हिंगोली शहर, हिंगोली ग्रामीण, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव, गोरेगाव, कुरुंदा, हट्टा, बाळापूर, वसमत शहर, वसमत ग्रामीण, बासंबा तसेच एटीबी विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यांना प्रामुख्याने पोलीस मुख्यालय हिंगोली येथे नियुक्त करण्यात आले आहे. काही कर्मचाऱ्यांची मोटार परिवहन विभागात विशेष नियुक्ती करण्यात आल्याने विभागीय कामकाजाला गती मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पोह/६५९ शेख मुजीबुर रहेमान शेख रहिम, पोशि/९१४ अझरुामाखों शफी पठाण, पोशि/९४६ गणेश ज्ञानदेव वाबळे, पोशि/२४० संतोष देवराव करे, पोह/८०२ शेख मोहम्मद शेख अहमद, पोना/४९ रमेश संभाजी कोरडे, पोह/७७२ रवि नारायण इंगोले, पोह/७४३ प्रदीप प्रकाश राठोड, पोशि/४९५ शेख नुर शेख ताहेर, पोह/१४१ शैलेश मुलचंद चौधरी, पोह/१७६ राहुल गोटरे, पोशि/५५२ गोविंद खांडेकर यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
तसेच औंढा नागनाथ येथील चापोह/४२५ माधव किशनराव सूर्यवंशी तसेच हट्टा येथील चापोशि/५६ प्रितम भिमराव चव्हाण यांची मोटार परिवहन विभाग, हिंगोली येथे नियुक्ती करण्यात आली आहे. मोटार परिवहन विभागातील वाढत्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयाने सर्व संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांना आदेश देत संबंधित कर्मचाऱ्यांना दि. २९ मे २०२६ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कार्यमुक्ती व रुजू प्रक्रियेबाबतचा अनुपालन अहवाल तातडीने सादर करण्यास सांगितले आहे. राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय हिंगोली यांना संबंधित कर्मचाऱ्यांना नव्या तैनातीच्या ठिकाणी हजर करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा पोलीस दलातील मनुष्यबळाचे संतुलन राखणे, कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करणे तसेच प्रशासकीय कामकाज अधिक कार्यक्षम बनविणे या उद्देशाने हा मोठा फेरबदल करण्यात आल्याची माहिती पोलीस विभागातील सूत्रांनी दिली. या बदलांमुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

أحدث أقدم