हिंगोली पोलीस दलात मोठे फेरबदल : ३९ पोलीस अंमलदारांची विविध ठिकाणी तैनाती

हिंगोली पोलीस दलात मोठे फेरबदल : ३९ पोलीस अंमलदारांची विविध ठिकाणी तैनाती

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली, दि. २९ मे 20/26
 जिल्हा पोलीस दलातील प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम व परिणामकारक करण्याच्या दृष्टीने हिंगोली पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मोठ्या प्रमाणावर पोलीस अंमलदारांच्या तैनातीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे, उपविभागीय कार्यालये तसेच मोटार परिवहन विभागातून एकूण ३९ पोलीस अंमलदारांची पुढील आदेशापर्यंत नवीन ठिकाणी तैनाती करण्यात आली आहे.
या आदेशानुसार हिंगोली शहर, हिंगोली ग्रामीण, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव, गोरेगाव, कुरुंदा, हट्टा, बाळापूर, वसमत शहर, वसमत ग्रामीण, बासंबा तसेच एटीबी विभागातील पोलीस कर्मचारी पोलीस मुख्यालय हिंगोली येथे तैनात करण्यात आले आहेत. काही कर्मचाऱ्यांची मोटार परिवहन विभागातही बदली करण्यात आली आहे.
तैनात करण्यात आलेल्या प्रमुख कर्मचाऱ्यांमध्ये पोह/६५९ शेख मुजीबुर रहेमान शेख रहिम, पोशि/९१४ अझरुामाखों पठाण, पोशि/९४६ गणेश वाबळे, पोशि/२४० संतोष करे, पोह/८०२ शेख मोहम्मद, पोना/४९ रमेश कोरडे, पोह/७७२ रवि इंगोले आदींचा समावेश आहे.
तसेच औंढा नागनाथ येथील चापोह/४२५ माधव सूर्यवंशी व हट्टा येथील चापोशि/५६ प्रितम चव्हाण यांची मोटार परिवहन विभाग, हिंगोली येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयाने संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांना आदेश दिले असून, सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना दि. २९ मे २०२६ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत कार्यमुक्त करून अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय हिंगोली यांना संबंधित कर्मचाऱ्यांना नवीन तैनातीच्या ठिकाणी रुजू करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या मोठ्या प्रशासकीय फेरबदलामुळे जिल्हा पोलीस दलातील मनुष्यबळाचे संतुलन राखण्यास मदत होणार असून कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

Post a Comment

أحدث أقدم