डायल 112 वर खोटा कॉल करून पोलिस यंत्रणेची दिशाभूल; हिंगोली ग्रामीण पोलिसांत एकावर कारवाई पोलीस निरीक्षक. विष्णुकांत गुट्टे

डायल 112 वर खोटा कॉल करून पोलिस यंत्रणेची दिशाभूल; हिंगोली ग्रामीण पोलिसांत एकावर कारवाई 
पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली, दि. 22 जून – आपत्कालीन सेवा क्रमांक डायल 112 वर खोटी माहिती देऊन पोलिस यंत्रणेची दिशाभूल करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात  0181/2026 अन्वये कलम 217 भारतीय न्याय संहिता अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 21 जून 2026 रोजी रात्री 10.37 वाजण्याच्या सुमारास मोबाईल क्रमांक 7709504142 धारक भास्कर वसु यांनी डायल 112 आपत्कालीन सेवेला कॉल करून हिंगोली-वाशिम रोडवरील वडद फाटा परिसरात तीन ते चार अज्ञात इसमांनी आपली गाडी अडवून मारहाण केली असून चार हजार रुपये लुटून नेल्याची माहिती दिली होती.
या घटनेची गंभीर दखल घेत पोलिस यंत्रणा तत्काळ सक्रिय झाली. संबंधित ठिकाणी पोलिसांनी धाव घेऊन चौकशी केली असता, कॉल करणाऱ्या व्यक्तीने दिलेली माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले. कोणत्याही प्रकारची चोरी, मारहाण अथवा आणीबाणीची परिस्थिती नसताना संबंधिताने जाणूनबुजून पोलिसांना त्रास देण्याच्या, शासकीय वेळ व संसाधनांचा अपव्यय करण्याच्या उद्देशाने खोटा कॉल केल्याचे तपासात समोर आले.
याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलिस शिपाई शरद  नागुलकर  यांच्या तक्रारीवरून एनसी दाखल करण्यात आली आहे. सदर एनसीची नोंद 22 जून 2026 रोजी पहाटे 1.12 वाजता करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे 
दरम्यान 
खोट्या आपत्कालीन कॉलमुळे पोलिसांची धावपळ
डायल 112 ही नागरिकांच्या मदतीसाठी असलेली महत्त्वाची आपत्कालीन सेवा असून अशा प्रकारचे खोटे कॉल केल्यामुळे पोलिस यंत्रणेचा वेळ व मनुष्यबळ विनाकारण खर्च होते. तसेच खऱ्या आपत्कालीन परिस्थितीत मदतीची आवश्यकता असलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यात विलंब होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने या सेवेचा वापर करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم