कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर पोलिसांची कारवाई; चालकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
29 जून 2026
औंढा नागनाथ : शहरात कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर तसेच मोठे हॉर्न लावून धावणाऱ्या दुचाकींविरोधात औंढा नागनाथ पोलिसांनी विशेष कारवाई केली. या कारवाईत संबंधित वाहनचालकांवर ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, मोठा आवाज करणारे सायलेन्सरही जप्त करण्यात आले.
ही कारवाई २८ जून रोजी पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
औंढा नागनाथ शहरात तसेच राज्य महामार्गावर कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींची संख्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंड आकारण्याबरोबरच त्यांच्या वाहनांवरील अनधिकृत सायलेन्सर काढून जप्त करण्यात आले.
या कारवाईत वाहतूक शाखेचे कर्मचारी वसंत चव्हाण, सुरेश डाखोरे, महेश गरजे आणि दिनकर पोले यांनी सहभाग घेतला.
यापुढेही कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर किंवा बेकायदेशीर हॉर्न लावून वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांनी दिला.
إرسال تعليق